औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या सरंक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलिस यंत्रणेतील कर्मचारी आणि त्यांचे कुटूंबीय नवीन बांधण्यात आलेल्या पोलिसांच्या इमारतीत पुरेसे पाणी नसल्यामुळे त्रस्त झाले आहेत. ‘कोरोना’च्या प्रतिबंधासाठी हात धुण्याचे सल्ले शासकीय पातळीवरून देण्यात येत असतांना दिवसातून एन वेळेस सुद्ध हात धुण्यासाठी पाणी वापरने पोलिस कुटूंबीयाला परवडेनासे झाले आहे.
आयुक्तालयाच्या आधुनिकीकरणा बरोबरच लगतच्या पोलिस कॉलनीचेही भाग्य बदलले आणि अतिशय सुंदर सात आठ मजली इमारती उभ्या राहिल्या. एका मजल्यावर चार पोलिस कुटूंब अशाप्रकारे प्रत्येक बिल्डींगमध्ये 28 कुटूंबांची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या दहा इमारतीमधून सुमारे 280 पोलिस कुटूंबियांची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वीच्या अतिशय अस्वच्छ आणि गचाळ खोर्यांच्या तुलनेत ही अवस्था खूपच चांगली आणि सुखद आहे. संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यात येतो. रूममध्ये व्यवस्थाही चांगली करण्यात आलेली आहे. पोलिस कॉन्स्टेबल ते पोलिस निरीक्षक दर्जापर्यंतचे कर्मचारी या इमारतीत राहतात. इतर सर्व सोयी -सुविधा असतांना पिण्याच्या पाण्यासारख्या महत्वाच्या समस्येकडे प्रशासनाचे कसे काय दुर्लक्ष झाले हे समजण्यास मार्ग नाही. सुमारे सहा महिन्यापूर्वी पोलिस उपायुक्त (प्रशासन) श्रीमती मीना मकवाना यांच्या हस्ते लॉटरी पद्धतीने घरांचे वितरण करण्यात आले असून पोलिस कर्मचारी बर्याच प्रमाणावर या इमारतीत शिफ्ट होऊ लागले आहेत. चांगल्या जागेत राहायला आल्याचा आनंद नळाची तोटी फिरविताच पार नाहिसा होतो असे पोलिसांनी सांगितले. पुरेसे पाणी येत नाही त्यामुळे खूप चिडचिड होते. असेही ते म्हणाले.
‘कोरानो’चे संकट
सध्या देशभर ‘कोरोना’चे संकट घोंगावत आहे. ‘कोरोना’ला रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सुचविण्यात येत आहेत. त्यापैकी महत्वाची सूचना म्हणजे वेळोवेळी हात-पाय धुने ही आहे. मात्र जेथे पिण्यासाठी पाणी पुरत नाही तेथे हात-पाय धुण्यासाठी कुठून आणणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पोलिस प्रशासन यंत्रनेने या संदर्भात तातडीने कारवाई करून पाण्याची समस्या नेहमीसाठी सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.